Pradhan Mantri Fasal Bima Yojana | प्रधानमंत्री पीक विमा योजना

Pradhan Mantri Fasal Bima Yojana :-राज्यात शेतकरयांना प्रधानमंत्री पीक विमा योजना आर्थिक विविध नैसर्गिक आपत्तींमुळे नुकसानीपासून शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत आहे.खरीप हंगाम विमा योजनेतील पिके: भात (धान), खरीप ज्वारी, बाजरी, नाचणी (रागी), मका, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग, तीळ, कारळे, कापूस व कांदा या अधिसूचित पिकांसाठी, अधिसूचित क्षेत्रातील शेतकऱ्यांना भाग घेता येईल.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

🎯 उद्दिष्टे

  • शेतकरी उत्पन्न स्थिर ठेवणे आणि आधुनिक शेतीपद्धती वाढवणे.
  • कृषी क्षेत्रात कर्जसुविधा चालू राहावी हमी देणे.
  • नैसर्गिक आपत्तींमुळे पीक नष्ट झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्षा देणे.

Pradhan Mantri Fasal Bima Yojana

🛡️कव्हरेज (Coverage)

  • फसले – खाद्यधान्य (धान्य, कडधान्य, तेलबिया) भात (धान), खरीप ज्वारी, बाजरी, नाचणी (रागी), मका, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग, तीळ, कारळे, कापूस व कांदा
  • धोक्यांचा समावेश
    • स्थायी पीक नुकसान – ड्राय स्पेल, दुष्काळ, पूर, वादळ, ओलांडणे, नैसर्गिक आग, किड किंवा रोगांमुळे होणारे नुकसान (सिड थ्रू हार्वेस्ट)
    • बाज़ सिचन अडव्हर्सिटी – जर अपेक्षित उत्पादन ५०% पेक्षा कमी असेल
    • रोपण न होणे – कमी पावसाचा परिणाम
    • पोस्ट‑हार्वेस्ट नुकसान – १४ दिवसांच्या आत अनपेक्षित पावसामुळे नुकसान
    • स्थानिक आपत्ती – हिल्स्टॉर्म, लँडस्लाइड, क्लाउडबर्स्टसारखे स्थानिक प्रकारचे अपघात फक्त प्रभावित क्षेत्रासाठी कव्हर

🎯महत्त्वाच्या बाबी

  • Pradhan Mantri Fasal Bima Yojana योजनेत सहभाग घेण्यासाठी शेतकऱ्याचा Agristek नोंदणी क्रमांक आणि ई पीक पाहणी आवश्यक आहे.
  • अधिसूचित क्षेत्रात अधिसूचित पिके घेणारे सर्व शेतकरी या योजनेत भाग घेऊ शकतात.
  • बिगर कर्जदार आणि कर्जदार शेतकऱ्यांना योजनेमधील सहभाग होणे ऐच्छिक आहे.
  • ई पीक पाहणी व विमा घेतलेले पीक यात तफावत आढळल्यास विमा अर्ज रद्द होईल व भरलेला विमा हप्ता जप्त होईल.
  • केंद्र शासनाने निर्धारित शुल्क ४० रुपये विमा अर्ज भरण्यासाठी प्रति शेतकरी CSC विभागाला दिले आहे. ते संबंधित विमा कंपनी मार्फत सीएससी विभागात दिले जाते त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांचा विमा हप्ता व्यतिरिक्त इतर शुल्क CSC सेंटर यांना देऊ नये.
  • एखाद्या अर्जदाराने फसवणूक करून विमा योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना पुढील किमान पाच वर्ष काळ्या यादीत टाकून शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ मिळणार नाही.
  • मंजूर नुकसान भरपाई अर्जदार यांचे आधार बँक खात्यात थेट केंद्र सरकार पोर्टलवरून जमा करण्यात येणार आहे.
  • सर्व पिकांसाठी जोखीम स्तर ७० टक्के.

Crop insurance scheme India

🎯उंबरठा उत्पादन आणि संरक्षणाच्या बाबी:
अधिसूचित क्षेत्रातील पिकांचे उंबरठा उत्पादन हे पाठीमागील सात वर्षातील सर्वाधिक उत्पादनाची पाच वर्षांच्या सरासरी उत्पादन गुणिले त्या पिकाचा जोखीम स्तर विचारात घेऊन निश्चित केला जात असतो. पीक पेरणी पासून काढणी पर्यंतच्या कालावधीत विविध नैसर्गिक घटक कीड व रोगांचा प्रादुर्भाव इत्यादी कारणांमुळे पीक कापणी प्रयोगाद्वारे येणारे सरासरी उत्पादन हे त्या महसूल मंडळासाठीच्या उंबरठा उत्पादनापेक्षा कमी आल्यास त्या महसूल मंडळामधील त्या पिकाचा विमा घेतलेल्या सर्व शेतकऱ्यांना समप्रमाणात नुकसान भरपाई मिळणार आहे.


🎯विमा योजनेत सहभागी होण्याकरिता शेतकऱ्याने काय करावे?

  • अधिसूचित क्षेत्रातील पिकासाठी कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यास या विमा योजनेत सहभाग आवश्यक नाही. त्यासाठी शेतकऱ्याने विमा योजना भाग घेण्याच्या अंतिम दिनांक आधी किमान सात दिवस आधी संबंधित बँकेस विमा हप्ता न भरणे बाबत लेखी कळवणे.
  • बिगर कर्जदार शेतकऱ्याने आपला Agristek नोंदणी क्रमांक, ७/१२ चा उतारा, बैंक पासबुक, आधार कार्ड आणि पीक पेरणीचे स्वयंघोषणापत्र घेऊन प्राधिकृत बँकेत विमा अर्ज देऊन व हप्ता भरून सहभाग घ्यावा. याशिवाय कॉमन सर्विस सेंटर (CSC) च्या मदतीने आपण विमा योजनेत सहभाग घेऊ शकता किंवा www.pmfby.gov.in या पोर्टलचे सहाय्य घेऊ शकता. भाग घेतलेल्या शेतकऱ्याने नंतर ई पीक पाहणी नोंद पूर्ण करावी
  • योजनेच्या माहितीसाठी संपर्क पीक विमा योजनेच्या अधिक माहितीसाठी किंवा नुकसान भरपाई माहितीसाठी केंद्र शासनाचे कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाइन १४४४७ वर संपर्क करावा, किंवा संबंधित विमा कंपनी प्रतिनिधि, स्थानिक कृषी विभाग कार्यालयाशी संपर्क साधावा.

जिल्हे :-
अहिल्यानगर, नाशिक, चंद्रपूर, सोलापूर,जळगाव, सातारा, वाशिम, बुलढाणा,सांगली, नंदुरबार, परभणी, वर्धा, नागपूर,नांदेड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, हिंगोली,अकोला, धुळे, पुणे, जालना, गोंदिया,कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, भंडारा,पालघर, रायगड, यवतमाळ,अमरावती, गडचिरोली

PMFBY login

विमा कंपनी :- एग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लिमिटेड

योजनेच्या माहितीसाठी संपर्क :- १४४४७

अंतिम मुदत: ३१ जुलै २०२५

🔍 अधिकृत संकेतस्थळ🔗येथे क्लिक करा

👉आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि एकत्रितपणे आपण या मोठ्या नोकरीच्या संधीचा पुरेपूर उपयोग करून आपल्या करिअरचे भविष्य प्रगतीच्या दिशेने घडवूया आणि पुढे जाऊया! 🎯

Leave a Comment