PM-USP Scholarship 2025 | प्रधानमंत्री उच्चस्तर शिक्षण प्रोत्साहन योजना

PM-USP Scholarship 2025:-प्रधानमंत्री उच्चस्तर शिक्षण प्रोत्साहन योजना :-महाराष्ट्र शासन शिक्षण संचालनालय (उच्च शिक्षण) महाराष्ट्र राज्य, मध्यवर्ती इमारत, पुणे-४११००१ सन २०२५-२६ करिता जाहिरात प्रधानमंत्री उच्चस्तर शिक्षण प्रोत्साहन योजना (पीएम-यूएसपी) अंतर्गत सेंट्रल सेक्टर शिष्यवृत्ती योजना महाविद्यालयीन व विद्यापीठीय विद्यार्थ्यांसाठी उच्च माध्यमिक (इयत्ता १२ वी) प्रमाणपत्र परीक्षेमध्ये कला, वाणिज्य, विज्ञान व व्यावसायिक (Vocational) या विद्याशाखांमधील उच्चतम गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना पुढील पदवी व पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रधानमंत्री उच्चस्तर शिक्षण प्रोत्साहन योजनेअंतर्गत सेंट्रल सेक्टर शिष्यवृत्ती योजना उच्च शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे तर्फे राबविण्यात येते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

📝योजनेच्या प्रमुख अटी:

  • उच्च माध्यमिक 12 वी (10+2) किंवा समकक्ष असणा-या परीक्षेत उत्तीर्ण Top 20 Percentile यादील सर्व विद्याथी पुढील पदवी व पदव्युत्तर शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना लागू आहे.
  • अर्दाजर इतर कोणत्याही शिष्यवृत्ती योजनेचा/स्टायपेंड लाभार्थी नसावा.
  • (Fresh) नवीन मंजूरी साठी अर्ज भरणा-या विद्यार्थीच्या पालकांचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रु.4.50 लाख पेक्षा जास्त नसावे.
  • (Renewal) नुतशनकरणाचे अर्ज भरणा-या विद्यार्थीना उत्पन्न प्रमाण पत्राची अटी लागू नाही.
  • (Renewal) नुतनीकरणचा अर्ज भरणा-या विद्यार्थीने मागील वषीक परीक्षेत 50 टक्के गूण प्राप्त करणे आवश्यक आहे.
  • महाविद्यालयमध्ये विद्यार्थीची उपस्थिती 75 टक्के असणे आवश्यक आहे.
  • एखादा पात्र विद्यार्थी नुतनिकरणासाठी अर्ज करावयाचा राहीला असेल तर पुढील वर्षी अर्ज करण्यास पात्र असेल. (परंतू ज्या वर्षाचा अर्ज करण्याचा राहीला आहे त्या वर्षाचा लाभ मिळणार नाही.)
  • एखादया पात्र विद्यार्थीचा नुतनिकरणासाठी अर्ज महाविद्यालय स्तरावर पडताळणी करावयाचा राहीला असेल तर सर्व अशा विद्यार्थीना पुढील वषी योजनेसाठी अर्ज करता येईल. (परंतू ज्या वषातचा अर्ज करण्याचा राहीला आहे त्या वर्षाचा लाभ मिळणार नाही.)

🧾पात्रता निकष :- सदर योजनेसाठी SSC, CBSE व ICSE बोर्डचे टॉप २० percentile यादातील यादीतील सर्व विद्यार्थी या योजनेच्या नवीन मंजुरीसाठी (Fresh) अर्ज करण्यास पात्र असतील.

Pradhan Mantri Central Sector Scholarship

📎आवश्यक कागदपत्रे :-

  • मागिल वर्षाची गुणपत्रिकेची प्रत
  • सक्षम प्राधिकरणाने दिलेले पालकाचे वार्षिक उत्पन्नाचे प्रमाणपत्र
  • सक्षम प्राधिकरणाने दिलेले रहिवास प्रमाणपत्र
  • मिागवद्यालयास चालु वर्षाची फी भरल्याची पावती / रिसीप्ट

नवीन मंजुरी संच :- केंद्रशासनाकडून महाराष्ट्र राज्य शिष्यवृत्तीसाठी ७४१७ नवीन मंजुरीसाठी आणि नूतनीकरणाचे संच केलेले आहेत.

अर्ज करण्याची पध्दत :- नवीन मंजुरीचे आणि नूतनीकरणाचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने नेशनल स्कॉलरशिप पोर्टलवरून (N.S.P) मागविण्यात येत आहेत. ऑफलाईन (Offline) पद्धतीने भरलेले अज कोणत्याही परिस्थितीत स्वीकारले जाणार नाहीत.

PM-USP scholarship amount

लाभाचे स्वरूप :-

अ.क्रअभ्यासक्रम प्रकारदेय रक्कम
1पदवीरु.12,000/-
2पदव्युत्तर पदवीरु.20,000/-
3पदवी व पदव्युत्तर एकत्रित
(Integrated Course)
1. प्रथम 3 वर्षासाठी रु.12,000/-
2. पुढील 4थे व 5वे वर्षासाठी रु.20,000/-
4अभियांत्रिकी अभ्यासक्रमांसाठी1. प्रथम 3 वर्षासाठी रु.12,000/-
2. शेवटच्या वर्षासाठी रु.20,000/-

Central Sector Scholarship for College Students

📆इतर महत्वाचे मुद्दे :-

नवीन मंजुरीसाठी केंद्रशासनाकडून गुणवत्ता यादी (Merit List) तयार करण्यात येते. विद्यार्थ्यांना मंजूर झालेल्या शिष्यवृत्तीची रक्कम केंद्रशासनामार्फत थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात (Under DBT Mode) जमा करण्यात येते. सदर शिष्यवृत्तीकरिता उच्च शिक्षण कार्यालयामार्फत केवळ माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, बोर्डचे विद्यार्थ्यांची यादी संचालनालयाच्या www.dhepune.gov.in या संकेतस्थळ्यावर लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल.

📆प्रधान मंत्री उच्चस्तर शिक्षण प्रोत्साहन योजनेअंतर्गत सेंट्रल सेक्टर शिष्यवृत्ती योजना सन २०२५-२६ करिता नवीन शिष्यवृत्ती व नूतनीकरण अर्ज सादर करण्यासाठी केंद्रशासनाने घोषित केलेले वेळापत्रक.

कार्यसूचीनवीन मंजुरी (Fresh) व नूतनीकरण (Renewal)
विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक३१.१०.२०२५

Apply for PM-USP Scholarship

🔖 अधिकृत PDF जाहिरात🔗येथे क्लिक करा
🔍 अधिकृत संकेतस्थळ🔗येथे क्लिक करा

संपर्क माहिती :- Help Line No. ०१२०-६६१९५ ४० किंवा helpdeshk@nsp.gov.in या ई-मेलवर संपर्क साधावा.

उच्च शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे – दूरध्वनी क्र. ०२०२९७०७०१८, ई-मेल schol.dhepune@gov.in व वेळोवेळी प्राप्त होणाऱ्या सूचनांसाठी www.scholarships.gov.inwww.dhepune.gov.in या संकेतस्थळाचे अवलोकन करावे.

(डॉ. शैलेंद्र देवळाणकर)
शिक्षण संचालक, उच्च शिक्षण
महाराष्ट्र राज्य, पुणे-०१

👉आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि एकत्रितपणे आपण या मोठ्या नोकरीच्या संधीचा पुरेपूर उपयोग करून आपल्या करिअरचे भविष्य प्रगतीच्या दिशेने घडवूया आणि पुढे जाऊया! 🎯

1 thought on “PM-USP Scholarship 2025 | प्रधानमंत्री उच्चस्तर शिक्षण प्रोत्साहन योजना”

Leave a Comment