CIPET Training :महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), पुणे
केंद्रीय पेट्रोरसायन अभियांत्रिकी एवं प्रौद्योगिकी संस्थान (सिपेट), छ. संभाजीनगर (औरंगाबाद) (रसायन एवं पेट्रोरसायन विभाग, रसायन एवं उर्वरक मंत्रालय भारत सरकार)
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (Academy of Maharashtra, Research, Uliftment & Training (AMRUT), Pune), पुणे व सिपेट, छ. संभाजीनगर यांच्याद्वारे महाराष्ट्रातील खुल्या प्रवर्गातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकाच्या अमृतच्या लक्षीत गटाच्या जाती गटातील युवक/युवतीसाठी पूर्णवेळ अनिवासी निःशुल्क कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत खाली दर्शवलेल्या प्रशिक्षणासमोर नमूद पात्रता धारक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.
निःशुल्क रोजगारक्षम व उद्योगाभिमुख कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम (अनिवासी)
अभ्यासक्रमाच्या कालावधीसह प्रशिक्षण कार्यक्रम (तास/महिने) :-
- UNIGRAPHICS CAD/CAM – 120 Hrs
- SOLIDWORKS – 80 Hrs
- AUTOCAD – 50 Hrs
- CREO – 80 Hrs
- MASTER CAM – 80 Hrs
- CNC MACHINING LATHE – 120 Hrs
- CNC MACHINING MILLING – 120 Hrs
- CNC MACHINING WIRE CUT EDM – 120 Hrs
- CNC MACHINING EDM – 120 Hrs
CIPET Training 2025
प्रवेश पात्रता (मूलभूत शिक्षण) :-
Diploma / Degree (Mechanical/Production/Automobile Engineering/DPT/DPMT/PD-PMD)/Post Graduate Diploma (PGD-PPT)/Ι.Τ.Ι. (Turner/Fitter/Machinist / Grinder/Tool & Die making/Welder)
प्रत्येक बॅचची क्षमता :- २०
- उपरोक्त कौशल्य विकास प्रशिक्षण हे निःशुल्क अनिवासी असून सदर प्रशिक्षणाचा संपूर्ण खर्च (प्रशिक्षण, राहणे व जेवण) अमृत, पुणे मार्फत करण्यात येईल, अनिवासी प्रशिक्षणाची सोय सिपेट, छ. संभाजीनगर येथे उपलब्ध आहे.
- उपरोक्त कौशल्य विकास प्रशिक्षण हे पूर्ण कालीन असून सदर कौशल्य विकास प्रशिक्षण सिपेट छ. संभाजीनगर या राष्ट्रीय पातळीवरील भारत सरकारच्या संस्थेद्वारे सिपेट छ. संभाजीनगर येथे देण्यात येईल.
- महाराष्ट्रातील खुल्या प्रवर्गातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील ज्या जातींना कोणत्याही शासकीय विभाग, संस्था, महामंडळे यांच्या योजनेचा लाभ मिळत नाही अशा खुल्या प्रवर्गातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकाच्या, लक्षीत गटाच्या जातीतील युवक-युवतीसाठी वयोगट १८ ते ४० मधील गरजू व इच्छुक पात्रता धारक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज व त्या अनुषंगिक कागदपत्रासह सादर करावेत.
- संबंधित उमेदवारांनी निवड कार्यक्रम स्थळी मूळ कागदपत्रासह स्वखर्चाने उपस्थित राहावे याची नोंद घ्यावी.
- प्राप्त अर्जामधून निकषांच्या आधारे अर्जाची छाननी करून निवडक उमेदवारांना पात्रता प्रवेश परीक्षा व मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल, पात्र उमेदवारांची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल, अपूर्ण असलेले तसेब मुदतीनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. (पात्रता प्रवेश परीक्षा इंग्रजी, गणित व सामान्य ज्ञान या विषयावर आधारित राहील.)
- इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या QR Code किंवा सिपेटच्या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज सादर करावे.
- अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवारांचा आधार क्रमांक व मोबाईल क्रमांक संलग्न लिंक असावा.
- प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या उमेदवारांची यादी अमृतच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.
- प्रशिक्षण सुरू झाल्यानंतर उमेदवारास प्रशिक्षणास गैरहजर राहता येणार नाही अथवा प्रशिक्षणमध्ये सोडून जाता येणार नाही.
- एखाद्या अभ्यासक्रमासाठी प्रशिक्षणार्थी संख्या मंजूर संख्येपेक्षा कमी पडत असेल तर तो अभ्यासक्रम सुरू होण्यास विलंब होऊ शकतो.
- प्रशिक्षणाच्या अभ्यासक्रमाचे घटक, कालावधी, स्थान व प्रवेश क्षमतेबाबतचे सर्व अधिकार संस्थेकडे राखीव असतील.
CIPET Training Quailificaton 2025
अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख : – २१/०६/२०२५
पात्रता प्रवेश परीक्षा कागदपत्रांची पडताळणी व मुलाखत :- २७/०६/२०२५ (अंदाजीत)
प्रशिक्षण सुरू होण्याची तारीख :- ०७/०७/२०२५ (अंदाजीत)
प्रशिक्षण ठिकाण :- सिपेट औरंगाबाद प्लॉट नंबर जे ३/२ एम.आय.डी.सी चिकलठाणा, छ. संभाजीनगर- ४३१००६
अर्ज कागदपत्रे :-
- विहीत नमुन्यातील व फोटोसहीत परिपूर्ण अर्ज
- विहित नमुन्यातील प्रतिज्ञापत्र
- प्रशिक्षणानुसार आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता प्रमाणपत्र (आय.टी.आय, डिप्लोमा, डिग्री ई.)
- खुल्या प्रवर्गातील अमृतच्या लक्षीत गटातील जातीचा असल्याबाबत पुरावा पृष्ट्यार्थ शाळा सोडल्याचा दाखला किंवा ट्रान्सफर सर्टिफिकेट किंवा कोणताही शासकीय दस्ताऐवज ज्यावर जातीचा सुस्पष्ट उल्लेख असेल.
- जन्म दाखला
- महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र
- आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील असल्याबाबत चालू वर्षाचे कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्नाचे प्रमाणपत्र किंवा EWS प्रमाणपत्र
- आधार कार्ड
- स्वतःचा फोटो
- स्वतःची सही
अधिक माहितीसाठी संपर्क :-
सिपेट : केंद्रीय पेट्रोरसायन अभियांत्रिकी एवं प्रौद्योगिकी संस्थान (सिपेट), छ. संभाजीनगर (औरंगाबाद) (रसायन आणि पेट्रोकेमिकल्स विभाग, रसायन आणि उर्वरक मंत्रालय, भारत सरकार) प्लॉट नं. जे 3/2, एम.आय.डी.सी. औद्योगिक वसाहत, चिकलठाणा, छ. संभाजीनगर (औरंगाबाद) 431006. फोन: 0240-2478302
मो.: 9325687910, 9145675585 | ई-मेल: aurangabad@cipet.gov.in | www.cipet.gov.in |
महत्वाची सूचना – अर्ज भरण्यापूर्वी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
सरकारी व निमसरकारी नोकऱ्यांबाबत तसेच इतर माहितीसाठी मोफत मराठी जॉब अलर्ट मिळवण्यासाठी दररोज mahanoukari.in या संकेतस्थळाला भेट द्या.
| 🔖 अधिकृत PDF जाहिरात | 🔗येथे क्लिक करा |
| 🔍 अधिकृत संकेतस्थळ | 🔗येथे क्लिक करा |
👉आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा !!! 🎯