Indian Railways Technician Recruitment 2025 Apply Now ! भारतीय रेल्वे तंत्रज्ञ भरती

Indian Railways Technician Recruitment : रेल्वे भरती मंडळ (RRB), मुंबई हे भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते. ते प्रामुख्याने गट ‘क’ कर्मचाऱ्यांची भरती करण्यासाठी जबाबदार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

रेल्वे भरती मंडळ, मुंबई, पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभाग आणि मुख्यालयासाठी आणि मध्य रेल्वेच्या मुंबई, नागपूर, सोलापूर, पुणे, भुसावळ विभाग आणि मुख्यालयासाठी, दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागासाठी आणि दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागासाठी भरतीचे काम करते. पूर्वी RRB मुंबई (तेव्हा रेल्वे सेवा आयोग म्हणून ओळखले जात असे) चर्चगेट येथे होते. फेब्रुवारी 1986 मध्ये ते मुंबई सेंट्रल येथे हलवण्यात आले. मुंबई सेंट्रल येथील RRB इमारत ऑक्टोबर 2000 मध्ये पुन्हा बांधण्यात आली आहे.

रेल्वे भरती मंडळ, मुंबई विभाग अंतर्गत जाहीर झालेल्या नोकरभरतीची सुवर्णसंधी पात्र आणि इच्छुक उमेदवारांसाठी आहे. या भरतीसाठी अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारले जातील. त्यामुळे, जर तुम्ही या संधीचा लाभ घेऊ इच्छित असाल, तर तुम्हाला ऑनलाइन अर्ज करावा लागेल. या भरतीमध्ये मोठ्या प्रमाणावर रिक्त पदे भरली जाणार आहेत, आणि उमेदवारांची निवड परीक्षा किंवा थेट मुलाखतीद्वारे केली जाईल. या भरतीसंबंधीची संपूर्ण आणि अधिकृत माहिती चला आता आपण सविस्तरपणे पाहूया.

मुंबई विभाग रेल्वे भरती मंडळ भरतीसंदर्भात अर्ज करण्यासाठीची आवश्यक शैक्षणिक पात्रता, ऑनलाईन अर्ज करण्याची महत्वाची लिंक, ऑनलाइन अर्ज पाठवण्यचा पत्ता, रिक्त पदांची सविस्तर संपूर्ण माहिती, मासिक वेतन, अर्ज करण्याच्या महत्त्वाच्या अंतिम तारखा, निवड प्रक्रिया, नोकरीचे ठिकाण याबद्दल सर्व अधिकृत जाहिरात PDF मध्ये सर्व बाबी खालील भागात नमूद केल्या आहेत.

जाहिरात क्रमांक02/2025
जाहिरात तारीख28.06.2025
विभागाचे नाव रेल्वे भरती मंडळ, मुंबई विभाग भरती -2025
ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख28.06.2025
रिक्त जागाविविध पदांसाठी एकूण 6238 जागा
अर्ज करण्याची पध्दतऑनलाईन

रेल्वे भरती मंडळ, मुंबई विभाग मध्ये विविध रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे, आणि इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. निवडीचे अंतिम अधिकार संबधित विभागाकडे असले तरी, प्रत्यक्ष मुलाखत किंवा परीक्षेच्या माध्यमातून उमेदवार अंतिम निवड यादीत स्थान मिळवत आहेत.

रिक्त पदांचा तपशील :-

पदांचे नाववेतनश्रेणीरिक्त पदे
तंत्रज्ञ ग्रेड-I सिग्नलRs. 29,200183
तंत्रज्ञ ग्रेड IIIRs. 19,9006055
एकूण 6238

विभागाचे नाव – रेल्वे भरती मंडळ, मुंबई विभाग भरती -2025

रिक्त जागा – विविध रिक्त पदे 6238

अर्ज करण्याची पध्दत – रेल्वे भरती मंडळ, मुंबई विभाग भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.

आवश्यक वयोमर्यादा – या भरतीसाठी दिनांक पर्यंत 01.07.2025 पदानुसार खाली दिलेल्या वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात.

  • तंत्रज्ञ ग्रेड-I सिग्नल) -18-33 वर्ष
  • तंत्रज्ञ ग्रेड III18-30 वर्ष
ऑनलाइन नोंदणी सुरू होण्याची तारीख28.06.2025
ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख28.06.2025 (23.59hrs)
ऑनलाईन अर्ज शुल्क भरण्याची शेवटची तारीख30.07.2025
ऑनलाइन अर्ज दुरूस्ती शेवटची तारीख01.08.2025 पासून 10.08.2025

शैक्षणिक पात्रता :- वरील भरतीत किमान 10वी पास तसेच विहित पात्रता उमेदवारांनी सर्व पात्रता निकष पूर्ण केले आहेत याची जाहिरात मधून खात्री करावी.

अर्ज सादर करताना आवश्यक कागदपत्रे :-

  • अर्जदाराचा फोटो/ सही तसेच डाव्या अंगठाचा ठसा (Left thumb)
  • शैक्षणिक प्रमाणपत्र
  • जात प्रमाणपत्र (SC/ST)
  • नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र
  • स्वयम लिखित घोषणापत्र
  • उत्पन्न आणि मालमत्ता प्रमाणपत्र
  • अपंगत्वाचे प्रमाणपत्र
प्रवर्गपरीक्षा शुल्क
खुला प्रवर्ग500 /- रुपये (+GST)
राखीव प्रवर्ग 250 /- रुपये (+GST)
⚠️ महत्त्वाची सूचना – अर्ज करण्यापूर्वी अवश्य वाचा!

प्रिय मित्रांनो, या भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी, अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचा आणि पात्रता पडताळूनच अर्ज सादर करा. जरी ही माहिती अधिकृत संकेतस्थळावरून संकलित केली असली तरी, काही ठिकाणी तफावत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे, अर्ज अंतिम करण्यापूर्वी सर्व तपशील स्वतः पडताळून घेणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा, यातील कोणत्याही चुकीसाठी आम्ही जबाबदार राहणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.
Indian Railways Technician Recruitment apply now 2025

सरकारी नोकरी, सरकारी योजना, Private Job’s तसेच इतर माहितीसाठी मोफत मराठी मध्ये अपडेट मिळवण्यासाठी दररोज mahanoukari.in या संकेतस्थळाला भेट द्या.

🔖 अधिकृत PDF जाहिरात🔗येथे क्लिक करा
🔍 अधिकृत संकेतस्थळ🔗येथे क्लिक करा

👉आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा !!! 🎯

Leave a Comment