MPSC Recruitment 2025 :महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाकडून प्राप्त मागणीपत्रानुसार सह संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, गट-अ या संवर्गातील पदभरतीकरीता विहित ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
MPSC Recruitment 2025
एकुण पद – 01
जाहिरातीमध्ये विहित केलेल्या अटी व शर्तीची पुर्तता करणाऱ्या उमेदवारांकडून आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.
शैक्षणिक पात्रता :-
वैधानिक विद्यापीठाची एम.बी.बी.एस. पदवी किंवा भारतीय वैद्यकीय परिषद कायदा च्या पहिल्या अनुसूची किंवा दुसऱ्या सूचीमध्ये नमूद केलेली इतर कोणतीही पात्रता असणे आवश्यक आहे.
अर्ज सादर करण्याची प्रक्रिया / कालावधी :-
- अर्ज सादर करावयाचा कालावधी :- 02 जून, 2025 ते 23 जून, 2025
- ऑनलाईन पध्दतीने परीक्षा शुल्क भरण्याकरीता अंतिम दिनांक :- 23 जून, 2025
- परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याचा दिनांक :- 25 जून, 2025
- परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक :-26 जून, 2025
Important Document List 2025
आवश्यक प्रमाणपत्र :-
- अर्जातील नावाचा पुरावा (एस.एस.सी. अथवा तत्सम शैक्षणिक अर्हता),
- वयाचा,
- शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असल्याबाबतचा पुरावा,
- आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील असल्याबाबतचा पुरावा,
- वैध नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्र,
- पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा,
- पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा,
- अनाथ आरक्षणाकरीता पात्र असल्याचा पुरावा,
- अराखीव महिला, मागासवर्गीय, आ.दु.घ., खेळाडू, दिव्यांग, अनाथ, माजी सैनिक, खेळाडू आरक्षणाकरीता पात्र असल्याचा पुरावा,
- एस.एस.सी. नावात बदल झाल्याचा पुरावा
- एस.एस.सी. नावात बदल झाल्याचा पुरावा मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा
- लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन,
- विहित अनुभवाचा पुरावा अर्जात केलेल्या दाव्यानुसार प्रकाशनांच्या प्रती महाराष्ट्र वैद्यकीय अधिनियम 1965 / भारतीय आयुर्विज्ञान परिषद अधिनियम 1956 अन्वये नोंद केलेल्या प्रमाणपत्राची प्रत उमेदवाराने धारण केलेल्या शैक्षणिक पात्रता भारतीय आयुर्विज्ञान परिषद / राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग यांची मान्यता असल्याबाबतचे प्रमाणपत्र लागेल .
Application Fees 2025
परीक्षा शुल्क :-
- मागासवर्गीय / अनाथ / दिव्यांग :- 449 /-रु
- उपरोक्त परीक्षा शुल्काव्यतिरिक्त बँक चार्जेस तसेच त्यावरील देय कर अतिरिक्त असतील.
- परीक्षा शुल्क ना-परतावा (Non-refundable) आहे.
महत्वाची सुचना :-
- आयोगाच्या कार्यालयात, परीक्षा कक्षात, परीक्षा केंद्राच्या परिसरात, तसेच, शारीरिक चाचणी व मुलाखतीच्या वेळी मोबाईल फोन, अथवा इतर कोणत्याही प्रकारची इलेक्ट्रॉनिक साधने आणण्यास व वापरण्यास सक्त मनाई आहे.
- प्रमाणपत्र तपासणीच्या वेळी पात्रतेसंदर्भातील सर्व मूळ प्रमाणपत्रे सादर न केल्यास शिफारस/नियुक्तीसाठी विचार करण्यात येणार नाही.
| ⚠️ महत्त्वाची सूचना – अर्ज करण्यापूर्वी अवश्य वाचा! प्रिय मित्रांनो, या भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी, अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचा आणि पात्रता पडताळूनच अर्ज सादर करा. जरी ही माहिती अधिकृत संकेतस्थळावरून संकलित केली असली तरी, काही ठिकाणी तफावत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे, अर्ज अंतिम करण्यापूर्वी सर्व तपशील स्वतः पडताळून घेणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा, यातील कोणत्याही चुकीसाठी आम्ही जबाबदार राहणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी. |
सरकारी व निमसरकारी नोकऱ्यांबाबत तसेच इतर माहितीसाठी मोफत मराठी जॉब अलर्ट मिळवण्यासाठी दररोज mahanoukari.in या संकेतस्थळाला भेट द्या.
| 🔖 अधिकृत PDF जाहिरात | 🔗येथे क्लिक करा |
| 🔍 अधिकृत संकेतस्थळ | 🔗येथे क्लिक करा |
👉आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा !!! 🎯