Shravan Bal Yojna : श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजना महाराष्ट्र शासनाची ही एक महत्त्वाची सामाजिक आधार योजना आहे. या अंतर्गत, ६५ वर्षांवरील निराधार वृद्धांना आर्थिक मदत दिली जाते, ज्यामुळे त्यांना वृद्धापकाळात आर्थिक स्थैर्य मिळून त्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत होते.
📝 योजनेचा प्रमुख उद्देश
या योजनेचा प्रमुख उद्देश निराधार व्यक्तींना दरमहा आर्थिक मदत देऊन त्यांचे जीवनमान सुधारणे हा आहे.पात्र लाभार्थ्यांना दरमहा ठराविक रक्कम दिली जाते.
👥 पात्रता निकष
- वय – ६५ व ६५ वर्षावरील पात्र वृध्द व्यक्तीना.
- निवृत्तीवेतन गट अ – दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव समाविष्ट असलेले.गट ब – कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. २१,०००/- किंवा त्यापेक्षा कमी असलेले व्यक्ती.
- राहिवासी – अर्जदार मागील १५ वर्षांपासून महाराष्ट्र मधील रहिवासी असावा.
💰 आर्थिक सहाय्य
श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजनेमध्ये पात्र अर्जदारांना मासिक रु. १५००/- आर्थिक सहाय्य देण्यात येते.
📄 आवश्यक कागदपत्रे
- स्वतः चे घोषणापत्र.
- वयाचा दाखला (शाळा सोडल्याचा प्रमाणपत्र किंवा जिल्हा शल्यचिकित्सक यांचे प्रमाणपत्र)
- रहिवाशी दाखला (ग्रामसेवक / तलाठी / मंडळ अधिकारी)
- उत्पन्नाचा दाखला (तहसिलदार)
- शिधापत्रिका (जर उपलब्ध असेल)
- आधार कार्ड , रेशन कार्ड , निवडणूक ओळखपत्र , बँक पासबुक झेरॉक्स , अर्जदाराचा फोटो इत्यादी.
📄 अर्ज कुठे करावा
- तहसील कार्यालय
- सेतू केंद्र
- जिल्हाधिकारी कार्यालय
- तलाठी कार्यालय
📝 ऑनलाईन अर्ज
https://aaplesarkar.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळ वर जाऊन सुद्धा करू शकता.
“ही योजना निराधार वृद्ध व्यक्तींना आर्थिक आधार देऊन त्यांचे जीवनमान सुधारण्याचे उद्दिष्ट पूर्ण करते पात्र व्यक्तींनी अर्ज प्रक्रिया पूर्ण करून या योजनेचा फायदा करून घ्यावा.”
👉आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा !!! 🎯