संजय गांधी निराधार अनुदान योजना: आर्थिक सहाय्य | Sanjay Gandhi Niradhar Yojana Check Now !

Sanjay Gandhi Niradhar Yojana : संजय गांधी निराधार अनुदान योजना महाराष्ट्र शासनाची एक महत्त्वाची सामाजिक सुरक्षा योजना आहे, जी निराधार व्यक्तींना आर्थिक मदत पुरवते. ही योजना विशेषतः अशा लोकांसाठी आहे ज्यांच्या कुटुंबाचा आर्थिक आधार नसतो किंवा जे स्वतःचा उदरनिर्वाह करण्यास सक्षम नसतात.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

📝 योजनेचा प्रमुख उद्देश

योजनेचा मुख्य उद्देश निराधार व्यक्तींना दरमहा आर्थिक सहाय्य देऊन त्यांचे जीवनमान सुधारण्याचा आहे. योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना मासिक आर्थिक अनुदान दिले जाते.

👥 पात्रता निकष

  • निराधार पुरुष व महिला, अनाथ मुले, दिव्यांग, क्षयरोग, कर्करोग, एड्स, कुष्ठरोग यासारख्या दुर्धर आजारामुळे स्वतःचा उदरनिर्वाह न करणारे,
  • निराधार विधवा, घटस्फोटित किंवा पोटगी न मिळालेल्या महिला, वेश्या व्यवसायातून मुक्त झालेल्या महिला, तृतीयपंथी,            देवदासी,३५ वर्षावरील अविवाहीत महिला, तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची पत्नी, सिकलसेल ग्रस्त व्यक्ती यांना लाभ मिळतो.
  • या योजनेमध्ये दारीद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असणे अथवा रुपये २१,०००/- पर्यंत कौटुंबिक वार्षिक उत्पन्न असणे आवश्यक आहे.

💰 आर्थिक सहाय्य

संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये पात्र अर्जदारांना मासिक रु. १५००/- आर्थिक सहाय्य देण्यात येते.

📄 आवश्यक कागदपत्रे

  • विहित नमुन्यातील अर्ज फॉर्म.                             
  • वय १८ ते ६५ वर्षे दरम्यान असावे. (१८ पेक्षा कमी वय – पालकामार्फत लाभ)           
  • किमान १५ वर्षापासून अर्जदार महाराष्ट्रातील रहिवाशी असावा. 
  • विधवा महिला अर्जदाराकरिता पतीचा मृत्यूचा दाखला.                                                                 
  • दिव्यांग – जिल्हा शल्यचिकित्साकांचा दाखला आवश्यक (किमान ४०%).                                   
  • अनाथ दाखला.
  • दुर्धर आजार प्रमाणपत्र
  • उत्पनाचा दाखला.
  • दिव्यांग – कमाल वार्षिक उत्पन रु. ५०,००० /-
  • इतर सर्व लाभार्थी कमाल वार्षिक उत्पन रु. २१,००० /-
  • आधार कार्ड , रेशन कार्ड , निवडणूक ओळखपत्र , बँक पासबुक झेरॉक्स , रहिवाशी दाखला, अर्जदाराचा फोटो इत्यादी.

📄 अर्ज कुठे करावा

  • तहसील कार्यालय (अनुदान योजना शाखा)
  • सेतू केंद्र
  • जिल्हाधिकारी कार्यालय
  • तलाठी कार्यालय

“ही योजना निराधार व्यक्तींना आर्थिक आधार देऊन त्यांचे जीवन सुधारण्याचा उद्देश करते. पात्र व्यक्तींनी अर्ज प्रक्रिया पूर्ण करून या योजनेचा लाभ घ्यावा”

👉आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा !!! 🎯

Leave a Comment