Central Bank of India Apprentice पदवीधर शिकाऊ 4,500 जागांसाठी मोठी भरती | Apply Now 2025

Central Bank of India Apprentice 2025: सेंट्रल बँक ऑफ इंडिया (CBI) पदवीधरांकडून बँकेत पदवीधर शिकाऊ म्हणून अर्ज मागवण्यात येत आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

सेंट्रल बँक ऑफ इंडिया ही एक आघाडीची सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे, ज्याचे संपूर्ण भारतात 4,500 पेक्षा जास्त शाखांचे नेटवर्क आहे, 7,00,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त व्यवसाय आहे, 33,000 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांच्या वचनबद्ध कार्यबलाने प्रेरित आहे. ही बँक अप्रेंटिस कायदा, 1961 अंतर्गत आणि बँकेच्या अप्रेंटिसशिप धोरणानुसार अप्रेंटिसच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवते. 1911 मध्ये स्थापन झालेली सेंट्रल बँक ऑफ इंडिया ही पहिली भारतीय व्यावसायिक बँक आहे जी पूर्णपणे भारतीयांच्या मालकीची आणि व्यवस्थापित होती. निवडलेल्या उमेदवारांना बँकेच्या विवेकबुद्धीनुसार संबंधित प्रदेशांमधील शाखा/कार्यालयांमध्ये नियुक्त केले जाईल.

पदाचे नाव :- पदवीधर शिकाऊ / Graduate Apprentice

एकूण जागा :- 4,500 (महाराष्ट्र मध्ये 586 जागा)

नोकरीचे ठिकाण :- कुठेही भारतात

निवड प्रक्रिया :- ऑनलाईन टेस्ट + प्रदेशीय भाषा टेस्ट (उदा. महाराष्ट्र-मराठी)

शैक्षणिक पात्रता :-

  • उमेदवाराने पदवीधर असणे आवश्यक आहे. तसेच, उमेदवाराने 01 जानेवारी 2021 नंतर पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी व त्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. वयोमर्यादा 20 ते 28 वर्षे असून, नियमानुसार योग्य ती सवलत लागू असेल.

अर्ज सादर करण्याची प्रक्रिया / कालावधी :-

  • ऑनलाइन अर्ज नोंदणीची सुरुवात तारीख :- 07-जून -2025
  • ऑनलाइन नोंदणीची अंतिम तारीख :- 23-जून-2025
  • ऑनलाइन शुल्क भरण्याची शेवटची तारीख :-07-जून-2025 पासून 25-जून-2025

जाणून घ्या ऑनलाइन अर्ज कसा करावा :

  1. nats.education.gov.in नोंदणीसाठी या अपरेंटिसशिप पोर्टलचा वापर करा.
  2. नोंदणी पूर्ण केल्यानंतर पोर्टलवर लॉगिन करून ‘नवीन अर्ज’ या पर्यायावर क्लिक करा
  3. नाव, संपर्क क्रमांक, ईमेल, शैक्षणिक पात्रता इत्यादी आवश्यक माहिती भरावी.
  4. बंधनकारक कागदपत्रे अपलोड करावी.
  5. अर्ज सबमिट(Submit) करा.

परीक्षा शुल्क :-

  • PWBD उमेदवार :- 400 /- (+GST)
  • अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती / सर्व महिला उमेदवार / आर्थिकदृष्ट्या दुर्बल :- 600 /- (+GST)
  • इतर सर्व उमेदवार :- 800 /- (+GST)

महत्वाची सूचना – अर्ज भरण्यापूर्वी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

सरकारी नोकरी, सरकारी योजना, Private Job’s तसेच इतर माहितीसाठी मोफत मराठी मध्ये अपडेट मिळवण्यासाठी दररोज mahanoukari.in या संकेतस्थळाला भेट द्या.

🔖 अधिकृत PDF जाहिरात🔗येथे क्लिक करा
🔍 अधिकृत संकेतस्थळ🔗येथे क्लिक करा

👉आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा !!! 🎯

Leave a Comment