Mumbai Port Trust Sports Recruitment २०25 :-मुंबई पोर्ट प्राधिकरण स्पोर्ट्सक्लब उद्देश गुणवत्तापूर्ण खेळाडूंना शटल बॅडमिंटन, क्रिकेट, फुटबॉल, हॉकी, कबड्डी आणि व्हॉलीबॉल या क्रीडा विभागामध्ये “क्रीडा प्रशिक्षणार्थी” म्हणून सहभागी करून घेणे आहे. या उपक्रमामार्फत इच्छुक आणि कुशल खेळाडूंना योग्य प्रशिक्षण, मार्गदर्शन व संधी प्रदान करून त्यांचा सर्वांगीण क्रीडा विकास साधणे हे उद्दिष्ट ठेवले आहे.
Mumbai Sports Club या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीनेच स्वीकारले जातील. त्यामुळे, जर तुम्ही या संधीचा लाभ घेऊ इच्छित असाल, तर तुम्हाला ऑफलाईन अर्ज करावा लागेल. या भरतीमध्ये मोठ्या प्रमाणावर रिक्त पदे भरली जाणार आहेत, आणि उमेदवारांची निवड परीक्षा किंवा थेट मुलाखतीद्वारे केली जाईल. भरतीसंबंधीची संपूर्ण आणि अधिकृत माहिती चला आता आपण सविस्तरपणे पाहूया.
मुंबई पोर्ट प्राधिकरण स्पोर्ट्स क्लब विभागात भरतीसंदर्भात अर्ज करण्यासाठीची आवश्यक शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची महत्वाची लिंक, अर्ज पाठवण्यचा पत्ता, रिक्त पदांची सविस्तर संपूर्ण माहिती, मासिक वेतन, अर्ज करण्याच्या महत्त्वाच्या अंतिम तारखा, निवड प्रक्रिया, नोकरीचे ठिकाण याबद्दल सर्व अधिकृत जाहिरात PDF मध्ये सर्व बाबी खालील भागात नमूद केल्या आहेत
Mumbai Port Trust Sports Quota Recruitment 2025
| जाहिरात क्रमांक | 2025-२६ |
| जाहिरात तारीख | 19.07.2025 |
| विभागाचे नाव | मुंबई बंदर प्राधिकरण क्रीडा क्लब भरती -2025-२६ |
| अर्ज पद्धत | ऑफलाईन |
| अर्ज अंतिम तारीख | 11.08.2025 |
मुंबई पोर्ट प्राधिकरण स्पोर्ट्स क्लब विविध पदांसाठी भरण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे, आणि इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. निवडीचे अंतिम अधिकार संबधित विभागाकडे असले तरी, परीक्षेच्या माध्यमातून उमेदवार अंतिम निवड यादीत स्थान मिळवत आहेत.
रिक्त पदांचा तपशील :-
| पदांचे नाव | रिक्त पदे | वेतनश्रेणी | शैक्षणिक पात्रता |
|---|---|---|---|
| क्रीडा प्रशिक्षणार्थी | पुरुष-52 महिला-2 | Rs. 16,000/- | – |
Mumbai Port Details Summary 2025
पदांचे नाव (Post Name) :- क्रीडा प्रशिक्षणार्थी भरती
विभागाचे नाव (Department Name) :- मुंबई बंदर प्राधिकरण क्रीडा क्लब भरती
एकूण रिक्त पदे (Toral Vacancies) :-पुरुष-52 आणि महिला-2 असे एकूण 54 प्रशिक्षणार्थी पदांसाठी भरती
नोकरी प्रकार (Job Type) :-उमेदवाराची करार पध्दतीने निवड त्यांच्या कामगिरीवर नुसार असेल.
नोकरीचे ठिकाण (Job Location) :- मुंबई
वयोमर्यादा (Age limit) :- ३१.०८.२०२५ रोजी किमान १८ वर्षे आणि ३०.०६.२०२६ रोजी कमाल २५ वर्षे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य अभियंता, मुंबई बंदर प्राधिकरण, स्थापत्य अभियांत्रिकी विभाग, पोर्ट हाऊस, तिसरा मजला, शूरजी वल्लभदास मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई – ४००००१
Mumbai Port Authority Recruitment 2025 last date
महत्वाच्या तारखा (Important Dates) :-
| ऑनलाइन अर्ज नोंदणी तारीख | 19.07.2025 |
| ऑनलाइन अर्ज भरण्याची शेवटची तारीख | 11.08.2025 |
Mumbai Port Trust jobs in Mumbai
अर्ज कसा करावा :-
- उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करणे आहेत,अन्य प्रकारे कोणतेही प्राप्त होणारे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत,याची कृपया नोंद घ्यावी
- अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 11 ऑगस्ट 2025, तारखेपर्यंत अर्ज पोहोचणे आवश्यक आहे.
- अर्ज सादर करताना २०० रुपये रकमेचा डिमांड ड्राफ्ट सीलबंद लिफाफ्यात करून, कार्यालयात सादर करावा.
- अर्जाचा नमुना http://www.mumbaiport.gov.in या अधिकृत वेबसाइटवरून देखील डाउनलोड करता येईल.
ऑफलाईन अर्ज करतांना उमदेवारांनी माहिती आणि कागदपत्रे तयार ठेवावी :-
- अर्ज फॉर्म
- प्रमाणपत्रांच्या स्व-साक्षांकित फोटो प्रती
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- २००/- रुपयांचा डिमांड ड्राफ्ट सीलबंद लिफाफ्यात जेटी जनरलकडे सादर करायचा आहे.
IMPORTANT NOTICE
निवड प्रक्रिया (Selecation Process) :-
- निवडलेल्या क्रीडा प्रशिक्षणार्थींची निवड ही त्यांच्या खेळांमधील कामगिरीवर आधारित असेल.
- निवड झालेल्या प्रशिक्षणार्थींना १० महिन्यांच्या कालावधीसाठी कराराच्या आधारे नियुक्त करण्यात येईल.
- ही नियुक्ती एमबीपीएच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून प्राप्त वैद्यकीय तंदुरुस्ती प्रमाणपत्राच्या आधारे केली जाईल.
- ही नियुक्ती पूर्णपणे तात्पुरती आणि कंत्राटी स्वरूपाची असून, या निवडीच्या आधारे कोणताही उमेदवार भविष्यात नियमित किंवा कायमस्वरूपी नियुक्तीचा दावा करू शकणार नाही.
| ⚠️महत्त्वाची सूचना: अर्ज करण्यापूर्वी कृपया वाचा ⚠️ प्रिय वाचकांनो, या भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी, अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कृपया आपली पात्रता तपासा आणि त्यानंतरच अर्ज सादर करा.ही माहिती अधिकृत संकेतस्थळावरून संकलित केली असली तरी, काही ठिकाणी थोडी तफावत असू शकते. त्यामुळे, अर्ज अंतिम करण्यापूर्वी सर्व तपशील स्वतः पडताळून पाहण्याची जबाबदारी तुमची आहे. या माहितीतील कोणत्याही चुकीसाठी आम्ही जबाबदार राहणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी. |
Mumbai Port Authority Offline Application Form
अधिकृत PDF जाहिरात आणि संकेतस्थळ (Official Advertisement & Website) :-
| 🔖 अधिकृत PDF जाहिरात | 🔗येथे क्लिक करा |
| 🔍 अधिकृत संकेतस्थळ | 🔗येथे क्लिक करा |
👉आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि एकत्रितपणे आपण या मोठ्या नोकरीच्या संधीचा पुरेपूर उपयोग करून आपल्या करिअरचे भविष्य प्रगतीच्या दिशेने घडवूया आणि पुढे जाऊया! 🎯